Monday, November 24, 2008

ऐरणीच्या देवा तुला Airanichya Deva Tula

ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहू दे

आभाळागत माया तुझी आम्हावारी राहू दे

लेऊ लेणं गरीबीचं, चनं खाऊ लोखंडाचं

जीणं होऊ आबरुचं, धनी मातूर माझ्या देवा, वाघावानी असू दे

लक्षीमीच्या हातातली चवरी व्हावी वर खाली

इडा पीडा जाईल, आली किरपा तुझी भात्यातल्या सूरां संग गाऊ दे

सुख थोडं, दुःख भारी, दुनिया ही भली बुरी

घावं बसंल घावावरी, सोसायाला झुंजायाला, अंगी बळ येऊ दे

No comments:

LinkWithin

Blog Widget by LinkWithin