Tuesday, March 30, 2010

Puneri IPL


पुणे आयपीएल संघासाठी नियम

खेळाडुंसाठी
1. “फलंदाजा कडून धावा निघत नसतील तर मैदानावर उगीच टवाळक्या करत बसू नये"
2. "गोलंदाजांनी चेंडू जपून वापरावा अन्यथा प्रत्येक नविन चेंडूचे ३ रुपये आकारण्यात येतील"
3. "क्षेत्रारक्षकांनी दुपारी १ ते ४ या वेळेत उगीचच Howzzat म्हणून गोंधळ करू नये, लोक इकडे झोपलेली असतात"

प्रेक्षकांसाठी
1. सामन्याची वेळ तुमच्या तिकिटावर छापलेली आहे, उगाच कधीही येऊन गर्दी करु नये
2. सामन्याच्या वेळेच्या आधी ३० मिनिटे मैदानात प्रवेश दिला जाईल, तुम्ही गडबड केल्याने सामना लवकर सुरु होणार नाही
3. खुर्चीचा वापर फक्त बसण्यासाठीच करावा ... एका खुर्चीवर एकच
4. मैदानात पिण्यासाठी (साध्या) पाण्याची व्यवस्था केली आहे. घरुन बाटल्या आणुन कचरा करु नये.
5. मैदानावरचे कॅमेरे हे सामन्याच्या हालचाली टिपण्यासाठी आहेत, उगाच हिडीस चाळे करुन त्यांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करु नये
6. आपण पुण्यासारख्या एका सुसंस्कृत शहरात एका सार्वजनिक ठिकाणी सामना पहात आहोत ह्याचे भान ठेऊन चियरलिडर्सना खाणाखुणा करु नये किंवा त्यांच्याकडे डोळे फाडुन बघुन लाज आणु नये. अश्लील चाळे कराल तर नुसतीच पोलीस कारवाई नाही तर धिंड काढण्यात येईल
7. फुंके ( सिगारेट, बिड्या, चिलीम ), थुंके ( तंबाखु, गुटका, मावा, पान ) आणि शिंके ( तपकीर आणि स्वाईन फ्ल्युग्रस्त ) ह्यांना मैदानात मज्जाव
8. मैदानात दारु विक्री केली जात नाही, मैदानात दारु पिऊ दिली जात नाही, मैदानात बाहेरुन दारु पिऊन आल्यास प्रवेश मिळणार नाही.

सगळ्यात महत्वाचे.
समोर नाचत असलेल्या चिअर लिडर्स जरी मस्तानी असल्या तरी आपण बाजीराव नाही. म्हणुन क्रुपया सामना खाली बसुन बघावा.

Monday, March 15, 2010

मराठी माणसाला काय येत?

मराठी माणसाला काय येत?
मराठी माणसाला काय येत?

मराठी माणसाला स्वराज्य उभं करता येतं…
मराठी माणसाला स्वातंत्र्यासाठी भर समुद्रात झोकून देता येतं…
मराठी माणसाला भारतीय चित्रपटसृष्टीची मुहूर्तमेढ रोवता येते…
मराठी माणसाला भारतीय राज्य घटना लिहिता येते…
मराठी माणसाला क्रिकेटचा शहेनशहा होता येतं…
मराठी माणसाला महासंगणक बनविता येतो…
मराठी माणसाला पार्श्वगायनात सम्राज्ञी बनता येतं…
मराठी माणसाला संपूर्ण भारतात पहिली मुलींची शाळा काढता येते…
मराठी माणसाला पहिली महिला शिक्षिका बनता येतं…
मराठी माणसाला पहिली महिला डॉक्टर बनता येतं…
मराठी माणसाला पहिली महिला राष्ट्रपती बनता येतं…


लाभले अम्हांस भाग्य बोलतो मराठी.....जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी.... .....!!!!!!

Wednesday, March 3, 2010

"Aman ki Asha"

Asha Bhonsale asserts 'Mumbai for all" as Raj Thackeray applauds...

...Unlike his uncle he is wise not to take on 'Deities of Marathi Manoos'

LinkWithin

Blog Widget by LinkWithin