Today's Loksatta carries a lovely letter describing the existing as well as extinct hills of Mumbai.
गेल्या तीन वर्षांत मुंबईच्या नगरसेवकांनी सर्वात सोपे समाजकार्य समजून तब्बल ४५६ जुन्या नावांचे बाळसे घातले आहे. या नादात मुंबईची भौगोलिक ओळख पुसत चाललेली आहे. ‘मलबार हिल’चे मूळ नाव वाळकेश्वर असे आहे; परंतु समुद्रातून येणारे चाचे हे मलबार (केरळ) येथून येत असल्याच्या वदंतेतून ‘मलबार हिल’ झाले. याच या परिसरात ‘कंबाला हिल’ (गामडिया रोड), रॉकी हिल, दादी शेठ हिल, फॉर्जेट हिल (वसंतराव नाईक मार्ग), अल्टामाऊंट रोड (बरोडावाला मार्ग), माऊंट प्लेझंट रोड (भाऊसाहेब हिरे मार्ग) अशा टेकडय़ा आहेत. माझगाव येथील जलाशय असलेल्या डोंगराला ‘भंडारवाडा हिल’ म्हणून ओळखतात. तेथे जाणारा रस्ता पूर्वीचा माऊंट रोड (डॉ. मस्करहन्स रोड) आणि हिल रोडला पूर्वी ‘बेलव्हेडर रोड’ नंतर कोयंडे मार्ग असे नामकरण झाले. शेजारी ‘सिनॅट हिल’ आहे. डोंगरी व उमरखाडी ही जवळच्या विभागाची भौगोलिक नावे. त्यामधील ‘नवरोजी हिल’च्या गल्ल्या आजही अस्तित्वात आहेत. वांद्रे (पश्चिम) येथील माऊंट मेरी (मतमावली) रोड ही डोंगरांचीच ओळख आहे. तेथे जाणारा हिल रोड (रामदास नायक मार्ग) आणि दुसरा रस्ता ‘मार्केल माऊंट’ होय. तसेच वांद्रे (पूर्व) येथे हुसेनी टेकडी व साईबाबा टेकडी, खारचा (प.) पाली हिल प्रसिद्ध आहे. शिवडी गोलंजी हिल (सखाराम लांजेकर मार्ग), युनूस कोंडाजीची खाण, राम टेकडी, लक्ष्मण टेकडी, एकसंध दगडात कोरलेली बारदेव असलेली टेकडी या शिवडीच्या भौगोलिक खुणा होय. आरे कॉलनीमधील डेअरी हिल रोड, जोगेश्वरी येथील दत्ता टेकडी, शीव टेकडी, स्मशान टेकडी, अंधेरी (पूर्व) कोलडोंगरी (जीवन विकास मार्ग) व बामनवाडा हिल, अंधेरी (पश्मि) येथील आंबोली हिल, आंबोली पाडा हिल, बालीवाला हिल असून, उभ्या खांबाचा कॉलमनर बेसॉल्ट असलेला भूवैज्ञानिक नवलाई असलेली ‘गिल्बर्ट हिल’ आहे. साकीनाका येथे अगर हिल्स आहे. घाटकोपर काजू टेकडी (बर्वेनगर) आणि आय.आय.टी. पार्क, तसेच हिरानंदानी पार्कच्या डोक्यावर असलेला ‘खंडोबाचा डोंगर’ सैनिकी टेहळणीसाठी संरक्षित आहे. कुर्ला स्टेशनच्या पूर्वेला कुरेशीनगर, वाहतूक पोलिसांचे मुख्यालय असलेला वरळीचा डोंगर, वडाळा येथील अँटाप हिल आणि चेंबूरच्या पुढे ‘मंडाळा तुर्भे’ डोंगराच्या कुशीत लपलेल्या तेल शुद्धिकरण्याच्या टाक्या व तेलसाठे व चेंबूरचा लाल डोंगर व लिटर मलबार हिल. कान्हेरी व जोगेश्वरी येथील टेकडय़ांवरील गुंफा, त्याचप्रमाणे मालाड येथील शांताराम टेकडी, भांडुप येथील साई हिल, अशी कितीतरी ठिकाणे मुंबईमध्ये एकेकाळी डोंगर-टेकडय़ा असल्याची साक्ष देत आहेत.
ज्ञानेश्वर गावडे, फोर्ट, मुंबई.
Image Courtesy: oldphotosbombay.blogspot.com
No comments:
Post a Comment