Wednesday, April 24, 2013

"आई... काय असतो हा बलात्कार??"

(या लेखातील सर्व नावे काल्पनिक आहेत)

घरचा अभ्यास पूर्ण करूनच मी खाली खेळायला गेले 'सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल काय' हे गाण बोलून दाखवल्याने आई तू आज मला बक्षिसही दिलेस!

मी आणि सायली दिवाळीसाठी किल्ले बनवत होतो, आमचे कपडे,हात आणि छोटंस नाक ही मातीने भरलं होत, तेवढ्यात मदन काका तेथे आले,हसतच म्हणाले काय बर....चाललंय? मी म्हणाले काका,तुमच्या सायलीचे पण अंग चिखलानेच मळलय, सायली तू थांब, तू चॉकलेट खाल्लस आता मी छकुलीला देतो,अस्स म्हणून मला घरी घेवून गेले,आणि मी घरात शिरल्यावर पटकन दारही बंद केले, मी चॉकलेट खाण्यात गुंग असताना माझ्या छाती-पाठीवरून ते हात फिरवत होते, मी म्हणाले काका चॉकलेट संपल आता मी घरी जाते... पण तुला नवीन ड्रेस देतो म्हणून माझ्या अंगावरचे कपडेही काढले आणि अचानक माझे तोंड दाबून मला जमिनीवरही पाडले, आई तू आणि बाबा गालावरच पापा घ्यायचे,पण काका संपूर्ण अंगावर घेत होते,त्यांच्या शरीराचा दाब माझ्या अंगावर पडल्याने माझे पोटही दुखतहोते, काका,अहो काका.... सोडा ना मला म्हणून मी रडत होते,गप्प बस नाही तर मारेन म्हणून ते माझ्यावरच ओरडत होते, अचानक झालेल्या वेदना सहन झाल्या नाहीत तेव्हा मला आई तुझीच आठवण येत होती,आता आई प्रतिकार करण्याची माझी ताकदही संपली होती,अचानक मदन काकांनी माझ्या नाका-तोंडावर उशी दाबली, आई सर्दी घ्यायला कसा त्रास होतो, तसच वाटत होत ग, घरातल्या भिंतीही पंख्यासारख्या माझ्या डोळ् फिरत होत्या, शेवटी मी उशीच्या आतंच हंबरडा फोडला ,आणि तुझाच चेहरा डोळ्यांसमोर ठेवून शेवटचा श्वास सोडला...


आई मदन काकांनी असं का केल ग? मी तर त्यांच्या सायलीचे फटाकेही नाही घेतले, तिच्या वाटेचे चॉकलेट ही नाही खाल्लं,मग का असे वागले ते माझ्याबरोबर? आठवतंय तुला आई ,एकदा कढईतल्या गरम तेलाचा थेंबमाझ्या हातावर पडला होता तेव्हा तू ही माझ्याबरोबर रडलीस,वपण आज तर माझ संपूर्ण शरीरच जळाल पण तू माझी हाक नाही ऐकलीस, आता आई दोन दिवस झाले तू आणि बाबा,संत्या मामा,रज्जु ताई,आजी सगळे-सगळे रडताय, मी तुम्हाला हाक मारतेय पण तुम्ही लक्ष्यचदेत नाहीये ,आई बर्थ-डेला तू माझ्या गळ्यात हार घालायचीस पण आज माझ्या फोटोला हार का घातला आहेस ग?


आज तर माझा बर्थ-डे ही नाही, सगळेजण तुला म्हणतात,"तुमची मुलगी देवाघरी गेली" पण आई.....देवाघरी जायला मदन काकां सारख्यांच्या वेदना सहन कराव्या लागतात का ग? आई मीतुला कधी पासून ओरडून-ओरडून सांगतेय, पण तू काही ऐकतच नाहीस, फक्त रडत बसलीयेस, आता माझा घसा पण सुखलाय मला थोड पाणी देशील का ग? ग्लासात नको माझ्या waterbag मध्येच दे, आई आता मी तुझ्या कडे येवू शकत नाही पण माझी सगळी खेळणी सायलीला दे आणि हो.. तिला सांग मदन काका म्हणजे तिच्या पप्पांकडून चॉकलेट नको घेवू हं.... नाहीतर ते तिला पण दुखवतील आणि उशीने तोंड दाबून देवाघरी पाठवतील!

आई शेजारच्या काकू बघ ना, आप-आपसात बोलत असतात.. अगं.. तिच्या मुलीवर "बलात्कार" झालाय.,

"सांग ना ग आई, काय असतो हा बलात्कार"?
"सांग ना ग आई, काय असतो हा बलात्कार"??


3M does not know the source of this story... he just received it on 'What's App' and was stunned by it... please share it if you want people to be aware of child abuse!

3 comments:

Nilesh J said...

Absolutely stunned! Hope this creates an awareness about child abuse in our society. Parents need to talk to their kids...

Laxmi Priya said...
This comment has been removed by a blog administrator.
Unknown said...
This comment has been removed by a blog administrator.

LinkWithin

Blog Widget by LinkWithin