Monday, November 17, 2008

Raj's letter to Marathi journos in "Bhaiyya Channels"

प्रती,

सर्व भैया चॅनेल्समधील मराठी पत्रकारांना... सस्नेह जय महाराष्ट्र

गेल्या दहा महिन्यांपासून आपल्या चॅनेल्सच्या माध्यमातून बातम्यांच्या नावावर जो काही तमाशा आपण दाखवत आहात त्याविषयी आपल्याला रुचेल, समजेल अशा लोकशाही माध्यमातून निषेध व्यक्त करावा म्हणून हा पत्रप्रपंच. मनसेने मराठी माणसांच्या अस्मितेसाठी, स्थानिक भूमीपुत्रांसाठी, लोंढ्यांच्या विरोधात जे आंदोलन उभारलं आहे, त्याला बदनाम करण्यासाठी आपण आपल्या वरिष्ठ भैया पत्रकारांसमवेत गळ्यात गळे घालून जे काही चालवलंय, ते आपल्या स्वत:च्या मनाला पटतं का? बिहारमध्ये रेल्वेगाडी जाळणाऱ्यांचा उल्लेख छात्र, असा केला जातो आणि मुंबईतील आंदोलकांचा उल्लेख मात्र जाणीवपूर्वक 'राज के गुंडे,' असा केला जातो. मराठी माणसांच्या भावना आपण आपल्या चॅनेलच्या माध्यमातून देशासमोर मांडायला हव्यात.

आज या आंदोलनात आपण आपली भूमिका योग्यपणे बजावली नाही तर महाराष्ट्राच्या भावी पिढ्या आणि महाराष्ट्राचा इतिहास आपल्याला कदापि क्षमा करणार नाही. तूर्तास एवढेच...

3M says... "No comments"

3 comments:

  1. No comments ka?
    mala aaple mat jaanun ghyayche ahe

    ReplyDelete
  2. nothing new in this...its what he says always......

    by the way for him

    hindi = bhaiyya = londhe.....

    forgive the journos raj those poor guys have a job to protect and families to feed.....

    ReplyDelete
  3. I have time and again highlighted that the media plays to gallery... They are doing it again... but the type of language used in the letter was not constructive... rather provocative!

    If u remember the "national Media" was rabidly anti-modi in the post godhra phase... they are praising him now... and probably lick him when he becomes the PM someday!

    Raj should concentrate on demonstrating positive things than writing such letters...

    But "chhtra vs Raj ke gunde" is a valid point he has raised

    ReplyDelete